तुम्ही ऑनलाइन अभ्यास करता की रिल्स पाहता? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विद्यार्थ्यांना मिश्कील सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा विद्यार्थी, पालकांशी थेट संवाद साधला. ऑफलाइन परीक्षांना सामोरे जाणाऱया विद्यार्थ्यांना पंतप्रधानांनी यशाचा मंत्र दिला. या चर्चे दरम्यान ऑनलाइन अभ्यास करताना लक्ष लागत नाही, अशी तक्रार विद्यार्थी, शिक्षकांनी केली. यावर उत्तर देताना मोदी यांनी तुम्ही ऑनलाइन अभ्यास करता की रिल्स पाहत असता? असा मिश्कील सवाल केला.

दोष ऑनलाइन किंवा ऑफलाइनचा नाही. वर्गातही उपस्थित असताना आपण शरीराने वर्गात हजर असतो. डोळे शिक्षकांकडे असतात, पण एकही गोष्ट कानात जात नाही. कारण आपले मन कुठेतरी दुसरीकडे आहे. ज्या गोष्टी ऑफलाइन होतात, त्याच गोष्टी ऑनलाइन होतात. याचा अर्थ माध्यम ही समस्या नसून मन ही समस्या आहे. माध्यम कोणतेही असो, आपले मन जर त्याच्याशी जोडले असेल तर ऑनलाइन किंवा ऑफलाइनचा काहीही फरक नाही, असे मोदी म्हणाले.

 नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियममध्ये पार पडलेल्या ‘परीक्षा पे चर्चा’मध्ये पेंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह सुमारे 15 लाख विद्यार्थी आणि अडीच लाख शिक्षकांनी देशभरातून हजेरी लावली. या कार्यक्रमाच्या शेवटी पंतप्रधानांनी निवेदन करणाऱया पाच विद्यार्थ्यांचे मंचावर बोलावून काwतुक केले.

राज्य मंडळाचे विद्यार्थी परीक्षेत व्यस्त
शुक्रवारी दहावीचा शेवटचा पेपर होता. त्यामुळे दहावीचे विद्यार्थी या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात सहभागी होऊ शकले नाहीत. बारावीच्या परीक्षा या नुकत्याच संपल्या आहेत. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम निष्फळ ठरला. या कार्यक्रमाचा सर्वाधिक फायदा पेंद्रीय शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांनाच झाला.

अभ्यासाइतकेच खेळाला महत्त्व
पंतप्रधान मोदींनी सांगितले की, खेळल्याशिवाय विद्यार्थी खुलणार नाही. खेळातून आपण प्रतिस्पर्ध्याच्या आव्हानांचा सामना करण्यास शिकतो. पुस्तके आपल्याला जे शिकवतात ते आपण खेळाच्या मैदानातही शिकू शकतो, मात्र आता खेळण्याला शिक्षणापासून वेगळे करण्यात आले आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून खेळांचाही शालेय जीवनात मोठा सहभाग असणार आहे.