शहरातील सेक्स रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश, चार महिलांसह दोन पुरुष ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर 

नगर शहरात वेश्या व्यवसाय छुप्या पध्दतीने एक बंगल्यास सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार आज सावेडी परिसरातील त्या बंगल्यात तोपखाना पोलिसांनी छापा टाकुन दोन पुरुष व चार महिलांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, या संदर्भात तोपखाना पोलिस ठाण्याचे संपत शिंदे यांनी कारवाई केली असून याचा तपास सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

नगर शहरात सावेडी भागात असणार्‍या महाविरनगरमध्ये रत्नप्रभा नावाच्या बंगल्यात वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराद्वारे येथील तोपखाना पोलिसांना मिळाली होती.  आज दुपारच्या सुमाराला या ठिकाणी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या बंगल्यात नेमका काय प्रकार चालतो याचे माहिती घेण्यास सांगितले होते. तर दुसर्‍या बाजुला पोलिसांचे पथकदेखील या परिसरात तैनात करण्यात आले होते. या ठिकाणी अनेक महिन्यांपासून वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे त्यांना या ठिकाणी आढळुन आले. पोलिसांनी या ठिकाणी तत्काळ छापा मारुन या ठिकाणावरुन चार महिला व दोन पुरुषांना पोलिसांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु केली आहे. या प्रकारच्या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. ज्यांच्या बंगल्यात हा व्यवयास सुरु होता त्यांच्या कुटुंबाची माहिती पोलिसांनी घेतली असून त्यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिराने गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते.

दरम्यान या संदर्भात तोपखाना पोलिस ठाण्याचे पोलिसा निरिक्षक संपत शिंदे यांनी सदरचा प्रकार हा उघडकीस आला असून पोलिसांन सहा जणांना ताब्यात घेतले आहे. यांच्या चौकशीमध्ये अन्य बाबीसुध्दा उघड होतील पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरु केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.