अण्णा नाईक विचारतायेत, मास्क वापरतास ना?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झी मराठीवर सोमवारपासून ‘रात्रीस खेळ चाले’चा तिसरा सीजन सुरू झाला असून अण्णा नाईक पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या मालिकेतील एका प्रोमोचा आधार घेत कोरोनाविषयी जनजागृतीसाठी महाराष्ट्र पोलिसांनी हटके ट्विट केले आहे. त्यात अण्णा नाईक चक्क ‘मास्क वापरतास ना?’ असे मालवणी भाषेत चाहत्यांना विचारताना दिसत आहेत. गंमत म्हणजे एरव्ही कुणालाही न ऐकणाऱया अण्णा नाईकांनीदेखील कोरोनापासून बचावासाठी चेहऱयावर मास्क लावलेला दिसत आहे.महाराष्ट्र पोलिसांनी सोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये मास्क लावणे, अंतर राखणे आणि हात स्वच्छ करणे या तीन गोष्टी लक्षात ठेवूया, कोरोनाचा ‘खेळ’ संपवूया! असे म्हटले आहे.

‘शेवंता’ही येणार !

अण्णा नाईक परत येत असल्याने त्यांची लाडकी शेवंता मालिकेत झळकणार की नाही याची सर्वांना उत्सुकता आहे. मात्र शेवंताची भूमिका साकारणाऱया अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने नाईकांच्या वाडय़ातील एक फोटो पोस्ट करत शेवंता देखील येणार असल्याचे संकेत दिले आहेत. ‘पुन्हा एकदा भेटुया…रात्री अकरा वाजता. रात्रीस खेळ चाले 3’ असे तिने म्हटले आहे.