मृत बेनेट यांचे सापडले धड, आता दुसर्‍या दत्तक मुलीचा शोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाकोला इथे राहाणार्‍या बेनेट रिबेलो यांचा त्यांच्याच दत्तक मुलीने खून केला होता. मुलीने त्यांचा खून करून त्यांच्या शरीराचे तुकडे करून विविध ठिकाणी फेकले होते. आता प्रभादेवी चौपाटीवर त्यांचे धड सापडले आहे. रिबोले यांनी आणखीण एका मुलीला दत्तक घेतले होते. पोलीस तिचा शोध घेणार असून तिचाही जबाब पोलीस नोंदवणार आहे.

डॅड मला माफ करा,मी वाईट मुलगी आहे! सावत्र बापाचा खून करणाऱ्या तरुणीचे पत्र सापडले

बेनेट यांची दत्तक मुलगी रियाने आपल्या अल्पवयीन प्रियकरासोबत मिळून बापाचा खून केला होता. रियाने रिबेलो यांचा खून करून त्यांचे अवयव वेगगळ्या सुटकेसमध्ये टाकून वेगगेळ्या ठिकाणी फेकून दिले होते. माहीम समुद्रकिनारी एक सुटकेस आढळल्यानंतर त्यातील कपड्यांच्या साहाय्याने पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. या हत्येमागे रिबेरो यांची दत्तक मुलगी रियाचा हात असल्याचे निष्पण्ण झाले. आपल्या प्रियकराच्या मदतीने तिने हे कृत्य केल्याचेही पोलीस तपासात स्पष्ट झाले. वडिलांनी लैंगिक छळ केल्याने आपण हे कृत्य केल्याचे तिने कबुल केले.

माहीमनंतर मिठी नदीत दुसरी सुटकेस सापडली, सुटकेसमध्ये डावा पाय व उजवा हात

रिबेलो यांनी अजून एका मुलीला दत्तक घेतल्याचे पोलिसांना कळाले आहे. पोलीस आता तिचा शोध घेत आहे. या खून प्रकरणात तिचा हात नसणार. परंतु तरी तिची जबानी घेणे हे गरजेचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच ती घाबरून कुठेतरी लपली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.