
येत्या काळात जर तुमचा गुंतवणुकीचा विचार असेल तर पोस्टाच्या बचत योजनांचा विचार करता येईल. याचा फायदा म्हणजे चांगला परतावा मिळतो आणि तुमचा पैसादेखील सुरक्षित रहातो.
सुकन्या समृद्धी योजना
1 ते 10 वर्षांच्या आतील मुलींच्या भविष्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. खाते उघडण्यासाठी कमीत कमी 250 रुपये आहे. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर वार्षिक 7.6 टक्के आहे. मुलगी 21 वर्षांची झाल्यावर मॅच्युरिटी रक्कम मिळते.
पीपीएफ
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही चांगला परतावा देणारी योजना आहे. ही लघु बचत योजना आहे. यामध्ये 7.1 टक्के व्याज देण्यात येते. वर्षाला कमीत कमी 500 रुपये, तर कमाल दीड लाख रुपये ठेवू शकतात. याची मुदत 15 वर्षे आहे.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना
60वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना आहे. सध्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा व्याजदर 8 टक्के आहे. मुदत पाच वर्षांची आहे. बचतीची मर्यादा कमीत कमी एक हजार ते 15 लाख रुपयांपर्यंत आहे.
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट
सध्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत 7 टक्के व्याजदर आहे. यामध्ये एक हजार रुपयांपासून बचत करू शकता. बचतीची कमाल मर्यादा नाही. जर तुम्ही एक लाख रुपये भरले तर पाच वर्षांनंतर 1 लाख 40 हजार 255 रुपये मिळतील.
पाच वर्षे ठेव योजना
ही पाच वर्षे मुदतीची ठेव योजना आहे. यामध्ये किमान एक हजार रुपये ठेवू शकता. ठेवीसाठी कमाल मर्यादा नाही.