प्रीपेडनंतर आता पोस्टपेड प्लॅनही महागणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी वित्तीय तूट भरून काढण्यासाठी कॉल आणि डेटा दरात काढ करून ती ग्राहकांकडून वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. होडाफोन आयडिया, एअरटेलने 3 डिसेंबरपासून प्रीपेड प्लॅनमध्ये दरवाढ केलेली असताना आता या कंपन्या आपला पोस्टपेड प्लॅनही महाग करण्याची शक्यता आहे.

गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदा टेलिकॉम कंपन्यांनी किमती वाढवल्या आहेत. याआधी टेलिकॉम सेक्टरमध्ये टॅरिफ वॉर सुरू होते. यामुळे 2016 मध्ये कॉलिंग जवळजवळ फ्री होती. तसेच डेटाच्या किमतीत 95 टक्के घसरण झाली होती. मात्र नफा- तोट्याचा मेळ जुळवताना टेलिकॉम कंपन्यांनी शुल्क वाढवायला सुरुवात केली आहे.

एमके ग्लोबलने आपल्या अहवालात म्हटलंय, येत्या काही दिवसांत  भारती एअरटेल आणि व्हीआयएल आपले पोस्टपेड प्लॅनमध्ये टॅरिफमध्ये बदल करण्याची घोषणा करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. भारती एअरटेल आणि व्हीआयएलने अनलिमिटेड युसेज कॅटगरीत प्रीपेड प्लॅनमध्ये 15-15 टक्के काढीची घोषणा केली आहे. नवीन योजना 3 डिसेंबरपासून सुरू करण्यात आली आहे.