
लस मिळणे ही पुढची गोष्ट आहे, पण ती उपलब्ध आहे की नाही याची माहिती मिळणेही सर्वसामान्यांना कठीण झाले आहे. त्यांच्या सोयीसाठी पवई येथील आयआयटी मुंबईने ‘कोव्हॅक्सिनेटर’ हा मोबाईल अॅप बनवला आहे. या अॅपवर आपल्याला लस उपलब्ध आहे का, याबाबत तातडीने आणि निश्चित माहिती मिळू शकणार आहे.
आयआयटी मुंबईतील इंडस्ट्रीयल इंजिनीअरिंग अॅण्ड ऑपरेशन्स रिसर्चने (आयईओआर) हा अॅप बनवला आहे. को-विन पोर्टलवरील डाटाही या अॅपद्वारे मिळू शकतो. को-विन पोर्टलवर दिलेल्या मोबाईल नंबरद्वारे ‘कोव्हॅक्सिनेटर’ अॅपवर लॉग-इन करून लसीकरणासाठी स्लॉटचे बुकिंग केले जाऊ शकते, अशी माहिती आयईओआरचे सहाय्यक प्राध्यापक मन्जेश हनवल यांनी दिली. पिन कोड, जिल्हा आणि लसीकरण पेंद्राचे नाव टाकून स्लॉटची उपलब्धता जाणून घेता येईल.
को-विन पोर्टलच्या सर्व्हरवरून या मोबाईल अॅपवर माहिती अपडेट होत राहील. विशेष म्हणजे स्लॉट उपलब्ध झाल्यास आपल्या मोबाईल पह्नवर अलर्टही मिळणार आहे. अपडेट लिंकवर क्लिक करताच आपण अॅपवर लॉग-इन करून स्लॉट बुक करू शकतो. स्लॉट बुकिंगसाठी लागणारा बराचसा वेळ या अॅपमुळे वाचणार आहे.
‘ऑटो बुक स्लॉट’चेही फिचर
लस घेतल्याचे प्रमाणपत्र डाऊनलोड केल्यानंतर ‘ऑटो बुक स्लॉट’चेही फिचर या अॅपवर आपल्याला उपलब्ध होते. लवकरच या अॅपवर अन्य ठिकाणी असलेल्या लसीकरण मोहिमांबद्दलही माहिती उपलब्ध होणार आहे.



























































