
प्रभादेवीतील वाघजाई माता सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या युवकांनी नुकतीच रायगडमधील पाली येथील सरसगड येथे प्लॅस्टिकमुक्त गडकोट ही मोहीम राबवली. संपूर्ण किल्ल्यावरील पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, बिस्कीट आणि खाऊचे आवरणे जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली. मोहिमेत सुमारे 25 युवकांनी सहभाग घेतला होता.
अनेक ट्रेकिंग संस्था मोठमोठे ग्रुप घेऊन सहलींचे आयोजन करत आहेत. पर्यटक आपल्यासोबत आणलेल्या पाण्याच्या बॉटल्स, खाऊचे आणि बिस्किटांचे आवरण गडावरच इतरत्र फेकतात. या पार्श्वभूमीवर प्लॅस्टिक मुक्त गडकोट मोहीम राबवण्यात आल्याचे मंडळाचे उपाध्यक्ष विनोद कदम यांनी सांगितले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन अमोल कदम, अजित कारके यांनी केले होते. तसेच विजयादशमीचे औचित्य साधून मंडळातर्फे किल्ल्यावर तोरण बांधण्यात आल्याचे कार्याध्यक्ष राज मोरे यांनी सांगितले.































































