
- प्रतीक राजूरकर
गडचिरोली जिह्यात 20-22 हत्तींचा एक कळप दाखल झाला. कमी संख्येने येणाऱया रानटी हत्तींची यापूर्वी फारशी दखल घेतली गेली नव्हती. परंतु या वर्षी पहिल्यांदाच इतक्या मोठय़ा संख्येने या भागात हत्ती आल्यामुळे वास्तव्यास असलेल्या नागरिकांत भीती तर वन्यजीव प्रेमींच्या मनात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण आहे. पुढील काही वर्षांत विदर्भातील वनक्षेत्रात रानटी हत्ती प्रस्थापित होणार का? हे बघावे लागणार आहे.
विदर्भातील ताडोबा, नागझिरा, पेंच वनक्षेत्र हा वाघाचा अधिवास म्हणून परिचित आहे. काही वर्षांअगोदर या भागात रानटी हत्तींचे वास्तव्य लक्षणीय स्वरूपात होते अशी नोंद आढळते. बदललेले पर्यावरण, अधिवास या कारणास्तव या भागात रानटी हत्तींचे वास्तव्य संपुष्टात आले. गेल्या दोन तीन वर्षांत रानटी हत्तींची पाऊले पुन्हा एकदा या वनक्षेत्राकडे वळू लागल्याच्या घटना समोर येऊ लागल्या. गेली दोन वर्षे महाराष्ट्राच्या सीमेत गडचिरोली जिह्यात तीन चार हत्तींचा एक कळप भटपंती करत येत होता. नुकतेच गडचिरोली जिह्यात महाराष्ट्र छत्तीसगड राज्यातून 20-22 हत्तींचा एक कळप दाखल झाला. कमी संख्येने येणाऱया रानटी हत्तींची यापूर्वी फारशी दखल घेतली गेली नव्हती. परंतु या वर्षी पहिल्यांदाच इतक्या मोठय़ा संख्येने या भागात हत्ती आल्यामुळे वास्तव्यास असलेल्या नागरिकांत भीती तर वन्यजीव प्रेमींच्या मनात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण आहे. पुढील काही वर्षांत विदर्भातील वनक्षेत्रात रानटी हत्ती प्रस्थापित होणार का? हे बघावे लागणार आहे. पर्यावरणतज्ञांनी रानटी हत्तींचे वास्तव्य पुढील काही वर्षांत विदर्भात पुन्हा प्रस्थापित होईल अशी शक्यता अनेकदा बोलून दाखविली होती. हिंदुस्थानातील सर्वात विशाल वन्यजीव असलेला हत्तींच्या गेल्या दोन वर्षांत विदर्भातील सततच्या प्रवेशाने तशी चाहुल दिल्याचे दिसते. गडचिरोली वनक्षेत्रातल्या महाकाय वन्यजीवाच्या चंचुप्रवेशाने तसे संकेत दिले आहेत.
रानटी हत्तींचा कळप गडचिरोली जिह्यातील धानोरा तालुकालगत काही गावांत दिसून आला. तालुक्यातील मुजलगोंदी गावात हत्तींचा कळप वास्तव्यास असल्याच्या वार्ता ऐकिवात आहेत. उल्लेखनीय म्हणजे गडचिरोली जिह्यात गेल्या एक दीड महिन्यांपासून एक वाघ नरभक्षक असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या भागातील नागरिकांना आणि वन्यजीवांना हत्तीचा सहवास प्रथमच अनुभवास येत असल्याने अभ्यासकांना नवीन अभ्यासक्रम मात्र निश्चितच प्राप्त झाला आहे. वन्यजीवांचा नैसर्गिक भाग असल्याने इतर वन्यजीव आलेल्या हत्तींसमवेत जुळवून घेतीलच. अगोदरच या भागातील नागरिकांच्या वन्यजीवांच्या बाबतीत अनेक तक्रारी आहेत, आता हत्तींच्या येण्याने अनपेक्षित पाहुणे आल्याप्रमाणे या भागातील नागरिक हवालदिल झाले आहेत. पाहुण्यांचा या भागात मुक्काम वाढल्यास नागरिकांची मात्र तारांबळ निश्चित आहे. सहसा हत्तींचा कळप फार काळ एकाच ठिकाणी वास्तव्य करत नाही. परंतु गडचिरोली जिल्हा हा सर्वांगाने हत्तींसाठी पोषक अधिवास आहे. इथली हिरवळ आणि बारमाही दुथडी भरून वाहणाऱया नद्या हत्तींना इथे आकर्षित करू शकतात. या भागातील नागरिकांना वनविभागाने हत्तींच्या कळपाने घाबरून जाण्याचे कारण नसल्याची हमी देत निवेदन जाहीर केले आहे. हत्तींच्या कळपाजवळ न जाणे, सेल्फी न काढणे, फटाके पह्डून त्यांच्या मार्गात अडथळा निर्माण न करणे अशा निवेदनात नागरिकांना सूचना केल्या आहेत. हत्तींचा मानवाच्या जीविताला धोका नसल्याचे सुध्दा वनविभागाने जाहीर करत नागरिकांना धीर दिला आहे.
मध्य हिंदुस्थानात 10 टक्के हत्तींचे वास्तव्य आहे. मध्य हिंदुस्थानातील छत्तीसगड स्थित हसदेव अरण्य वनक्षेत्रात हत्तींसाठी संवर्धन क्षेत्र घोषित केले होते. 1600 चौ. कि.मी.चे वनक्षेत्र त्यासाठी राखीव ठेवण्यात आले होते. परंतु तत्कालीन राज्य सरकारने ते कमी करून केवळ 400 चौ.कि.मी. क्षेत्र हत्तींच्या संवर्धनासाठी उपलब्ध करून दिले. उर्वरित वनक्षेत्र कोळसा खाणी बघता तो भाग अदानीला देण्यात आला. कालांतराने छत्तीसगड राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यावर हे क्षेत्र 1900 चौ.कि.मी. वाढवण्यात आले. कोळसा खाणी या वन्यजीवांच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा निर्माण करू लागल्या आहेत.
ब्रिटिश राजवटीत 18 व्या शतकाच्या शेवटी राष्ट्रीय वननीतीनुसार वनांचे शेतीयोग्य जमिनीत रूपांतर करण्याचे ध्येय होते. यामुळे बरीच वनजमीन यात कमी झाली. तसेच 19 च्या शतकात लोकसंख्या वाढ हेही वने कमी होण्यास कारणीभूत झाले, कारण अन्नाची अतिरिक्त गरज तसेच इंधन आणि उपजीविकेसाठी वने उपज यामुळे वने आणि वन्यप्राणी यावर ताण निर्माण झाला. 20 वे शतक ऊर्जा आणि खनिज उत्पादनाची वाढती आवश्यकता यामुळे अतिशय दुर्गम भागातील वनेही धोक्यात येऊन हत्तीचे मूळ वसतीस्थान धोक्यात आले. चालू शतकात तर लोकसंख्या, अन्नासाठी शेती, आर्थिक विकासासाठी खाणी, ऊर्जा आणि याकरिता धरणे, कालवे, रस्ते आणि रेल्वे यांचे जाळे यांचा परिपाक होऊन हत्तीसारख्या प्रचंड प्राण्यांची तंगडतोड होत असून ते भरकटून सैरभैर होत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना स्थिरता मिळणे आवश्यक आहे. इतर राज्यांतून विस्थापित झालेले हत्ती आता महाराष्ट्रात प्रस्थापित होणार का?
n हत्तींना सुरक्षितता लाभावी म्हणून ‘हत्ती प्रकल्प’अंतर्गत गोंदियातील दरेकस्सा-राजोली तर राजोलीपासून पुढे टिप्पागड- भामरागड-कोलामारका हे गडचिरोलीतील वन प्रदेश ‘हत्ती राखीव’ घोषित करण्यात यावे. यामुळे महाराष्ट्र-मध्य प्रदेश-छत्तीसगड हे संलग्नित राहतील. याकरिता आंतर राज्य मसुदा संमत करण्यात यावा, जेणेकरून मध्य हिंदुस्थानात हत्ती सुरक्षित तर राहतीलच, पण यामुळे नैसर्गिक वनांचे संवर्धन, पण आपोआप होईल. हत्ती माणसांसारखा सामाजिक व भावनिक प्राणी आहे. मिश्र वने ही हत्ती आणि सर्वच जीवितांसाठी गरज आहे. अशी वने पाण्याचे साठे असतात. म्हणून यांचे संगोपन व्हावे या दृष्टीने वनसंवर्धनासाठी हत्तींचे बळ आपल्याला कामी येऊ शकत असल्याने हत्ती संवर्धन आराखडा राज्य आणि आंतरराज्य स्तरावर व्हावा. या तरतुदींमुळे वाघ, रानम्हैस, शेकरू व सर्वच महत्त्वाच्या जैवविविधतेचे संवर्धन होऊन हा संपूर्ण वन प्रदेश परिस्थितिकीय सुरक्षित ठेवा म्हणूनही महाराष्ट्राचे भूषण ठरेल यात शंका नाही.
– प्रफुल्ल भांबुरकर,
समन्वयक वाईल्ड लाईफ ट्रस्ट इंडिया































































