Photo – राष्ट्रपती मुर्मू यांची राफेल भरारी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी हरियाणातील अंबाला हवाई दलाच्या तळावरुन राफेल या लढाऊ विमानातून भरारी घेतली. राफेल उडवण्याचा हा त्यांचा पहिला अनुभव होता. त्यानिमित्ताने त्यांनी फायटर पायलटचा विशेष सूट घातला होता. राफेल विमानात बसून त्यांनी 20 मिनिटांची सफर केली. यावेळी त्यांच्यासोबत एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग हेदेखील विमानात उपस्थित होते.