कसोटी मालिकेआधी टीम इंडियाला झटका, पृथ्वी शॉ दुखापतग्रस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । सिडनी

ऑस्ट्रेलियातील सिडनी क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरू असलेल्या सरावा सामन्यादरम्यान टीम इंडियाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ दुखापतग्रस्त झाला आहे. क्षेत्ररक्षण करत असताना पृथ्वीच्या डाव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली आहे. येत्या 6 डिसेंबरला होणाऱ्या ऑस्ट्रेलिया व हिंदुस्थानमध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. त्याआधी पृथ्वी शॉला दुखापत झाल्याने हिंदुस्थानला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

सिडनीच्या मैदानावार ऑस्ट्रेलियाच्या संघासोबत हिंदुस्थानचा सराव सामना सुरू आहे. आज सकाळी तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला. क्षेत्ररक्षण करत असताना सीमारेषेजवळ एक कॅच पकडत असताना पृथ्वी शॉच्या पायाला दुखापत झाली. त्यानंतर टीमचे फिजीओ पॅट्रीक फरहार्ट व आणखी एक सदस्य त्याला उचलून ड्रेसिंग रुमपर्यंत नेले. त्यानंतर एक्सरे काढण्यासाठी पृथ्वीला रुग्णालयात नेण्यात आले. गुरुवारी पृथ्वी शॉने या सामन्यात दमदार फलंदाजी करत 66 धावा केल्या होत्या.