खासगी बसचालकाचा शाळकरी मुलीवर अत्याचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खासगी बसचालकाने अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार कोंढवा परिसरात घडला आहे. आरोपीने पीडित मुलीला रिलेशनशिपमध्ये राहू असे म्हणत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी बसचालक सोमेश्वर घुले-पाटील (35) याला अटक केली आहे. ही घटना मार्च ते जून या कालावधीत घडली.

पीडित मुलगी कोंढवा परिसरातील नामांकित शाळेत शिक्षण घेते. ती खासगी स्कूल बसमधून शाळेत ये-जा करते. त्यामुळे तिची संबंधित बसचालक सोमेश्वरसोबत ओळख झाली होती. आरोपीने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही तिला ‘रिलेशनशिप’मध्ये राहणार असे विचारत प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मुलीला रिलेशनशिप म्हणजे काय हे माहीत नसतानाही तिने होकार दिला. अल्पवयीनपणाचा गैरफायदा घेत बसचालक सोमनाथने तिच्यावर पीडितेच्या दोन मैत्रिणींच्या घरी आणि पडीक इमारतीत अत्याचार केला.