
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथील कैराना परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका खासगी क्लिनीकमध्ये ठेवण्यात आलेल्या दोन नवजात बालकांचा एअर कंडिशनरच्या गारठ्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत मुलांच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरुन डॉक्टरविरोधात हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी कैराना ठाण्याचे नेत्रपाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य विभागाने या घटनेचा तपासाचे आदेश दिले आहेत. अप्पर मुख्य चिकित्सा अधिकारी डॉक्टर अश्वनी शर्मा यांनी रविवारी सांगितले की, या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. याप्रकरणी दाखल करण्यात तक्रारीत बसेडा गावचे रहिवासी नाजिम आणि कैराना येथील साकिब या दोघांनी त्यांच्या दोन नवजात मुलांना शनिवारी उपचारासाठी स्थानिक खासगी क्लिनीकच्या फोटोथेरपी यूनिटमध्ये ठेवण्यात आले होते. हाही आरोप आहे की, डॉक्टर नितू शनिवारी रात्री झोपण्यासाठी एअर कंडिशनर सुरु केले आणि रविवारी सकाळी नातेवाईक बाळांना बघायलाा गेले तेव्हा दोन्ही बालक मृत अवस्थेत आढळले.
दोन्ही मुलांचा जन्म शनिवारी कैरानाच्या सरकारी प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात झाला होता आणि त्यानंतर त्याच दिवशी त्यांना खासगी क्लिनीकमध्ये हलविण्यात आले होते. दरम्यान पिडीत कुटुंबियांनी घटनेचा विरोध करत डॉक्टर नीतूविरोधात कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे.