शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी पोलंडच्या राजदूतांना नडल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
priyanka-chaturvedi-new

रशिया-युक्रेनच्या भयंकर युद्धात हिंदुस्थानातील शेकडो विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असताना शेजारील पोलंड देश मात्र विद्यार्थ्यांना आपल्या देशाच्या सीमेवर रोखून परत पाठवत असल्याचा संतापजक प्रकार समोर आला आहे. यावर शिवसेना प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी पोलंडच्या राजदूतांना चांगलेच फटकारले आहे. पोलंडच्या या कृत्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करताना ‘ऑपरेशन गंगा’ आणि देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने याकडे गंभीरपणे लक्ष द्यावे, असेही म्हटले आहे.

प्रियंका चतुर्वेदी यांच्या ट्विटनंतर पोलंडचे राजदूत बुराकोक्स्की यांनी प्रत्युत्तर देत पोलंड सरकारने युक्रेनच्या सीमेलगत कुणालाही अडवले नसल्याचे स्पष्ट केले आहे. या ट्विटला प्रत्युत्तर देताना चतुर्वेदी यांनी सडेतोड उत्तर देत माझ्याकडे काही विद्यार्थ्यांचे मोबाईल नंबर आणि नावे असल्याचे स्पष्ट केले. आपण आधी सूत्रांकडून माहिती घ्या, फेक न्युज पसरवू नका असे म्हटले आहे. यावर राजदूतांनी आपल्याशी संपर्क करावा, असे आवाहन केले.