
हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या खेळाडूंची मैदानात तसेच मैदानाबाहेरही तुलना होत असते. आयपीएल आणि पीपीएलची तुलना तर हमखास होते. परंतु आयपीएलमध्ये खेळाणाऱ्या खेळाडूंना पीसीएल पेक्षा अनेक पटींनी जास्त पैसा मिळतो हे आपल्याला माहितीय. परंतु हिंदुस्थानच्याच दोन कबड्डी खेळाडूंचीही सॅलरी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमहून अधिक आहे.
पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळण्यासाठी बाबर आझम आला 1 कोटी 24 लाख रुपये मिळतात. परंतु प्रो कबड्डी खेळणारे हिंदुस्थानचे स्टार खेळाडू प्रदीप नरवाल आणि सिद्धार्थ देसाई यांना बाबरहून अधिक सॅलरी मिळते. प्रो कबड्डीमध्ये 40 मिनिटांचा सामना असतो, तर पीसीएलचा एक सामना चार तास चालतो. असे असतानाही पीसीएल खेळणाऱ्या बाबरसह अन्य खेळाडूंना कमी पैसे मिळतात.
प्रो कबड्डीमध्ये यूपी योद्धा संघाकडून खेळणाऱ्या प्रदीप नरवाल याला 1 कोटी 65 रुपये मिळतात. प्रो कबड्डीमधील तो सर्वात महागडा खेळाडू आहे. त्यानंतर सिद्धार्थ देसाई याचा नंबर लागतो. त्याला एका सीझनसाठी 1 कोटी 30 लाख रुपये मिळतात. दोन्ही खेळाडूंची सॅलरी बाबर आझम याच्या 1 कोटी 24 लाखांच्या सॅलरीहून अधिक आहे.
पकड, पकड, कसके पकड! ‘यू मुंबा’च्या सरावाचा थरारक फोटो व्हायरल
22 डिसेंबरपासून सुरू होणार आठवा सीझन
प्रो कबड्डीचा मागचा सीझन कोरोनामुळे झाला नव्हता. परंतु यंदा ही स्पर्धा 22 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. खेळाडू बंगळुरूला पोहोचले असून क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर मैदानात उतरतील. अनेक संघांनी आपला सरावही सुरू केला आहे.





























































