जपा हृदयाचे आरोग्य! व्हिडीओतून जनजागृतीचा संदेश

घोरणे हा बहुतेकदा घरातील एखाद्या व्यक्तीसाठी नेहमीच विनोदांचा प्रकार ठरतो. जोडीदार हा त्रास सहन करत असतात आणि अनेकदा मित्रमैत्रिणी त्यावरून चिडवत असतात, डिवचत असतात. पण जर तो आवाज केवळ त्रासदायक नसेल तर काय? तुमचे हृदय तुम्हाला कोणत्यातरी मदतीसाठी विचारत तर नसेल ना?

जागतिक हृदय दिनानिमित्त आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या नव्याने तयार करण्यात आलेल्या डिजिटल कॅम्पेनरुपी चित्रफितीमागे हीच शक्तिशाली कल्पना दडलेली आहे. विनोदी शैलीतील पण विचार करायला लावणारे कथानक असलेली ही चित्रफित दररोजच्या घोरण्याच्या सवयीमुळे इतरांची होणाऱ्या चिडचिडीतून स्लीप एपनियाच्या लक्षणाकडे अंगुलीनिर्देश करते. ही स्थिती हृदयरोगाचा धोका तिप्पट करू शकते.

सोफ्यावर पहुडलेल्या दोन रूममेट्सच्या प्रसंगातून हे कथानक उलगडते: या प्रसंगात एक तंदुरुस्त दिसणारा माणूस गाढ झोपलेला परंतु जोरात घोरत आहे आणि त्याचा मित्र त्याच्याकडे पाहत असतो. तो काहीसा चिडलेला पण असहाय्य आहे. घोरण्याचा आवाज जसजसा जोरात वाढत जातो आणि एक वाक्य कानावर पडते: “इसका हृदयरोग का धोका तीन गुणा ज्यादा है… और इससे पता भी नहीं है.” या चित्रफितीत दडलेली ही आरोग्याबाबतची चेतावणी आपल्या सर्वांसमोर अशी प्रकटते आणि ती म्हणजे सतत घोरणे हे स्लीप एपनिया असू शकते आणि जे कळत नकळत हृदयावर ताण वाढवत असते.

भारतात ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया (ओएसए) ही एक अतिशय कमी प्रमाणात निदान झालेली आरोग्य समस्या आता हळूहळू समोर येत असताना या मोहीमेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. या आरोग्य समस्येमुळे अंदाजे १०.४ कोटी भारतीयांना स्लीप एपनियाचा त्रास होत आहे. उपचार न केलेली ओएसए ही समस्या उच्च रक्तदाब, एरिथमिया आणि हृदय बंद पडणे यासह हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित असलेल्या रोगांची शक्यता लक्षणीयरीत्या वाढवू शकते, असे अभ्यासातून दिसून आले आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जोड देत ही मोहीम प्रेक्षकांना आपले हदय जपण्यासाठी आत्ताच प्रोत्साहित करते. आयएल टेककेअर ॲपव्दारे, संबंधित व्यक्ती आपण कसे आणि कितीवेळ घोरता हे रेकॉर्ड करू शकतो आणि या समस्येसाठी वैद्यकीय सल्लामसलत योग्य आहे की नाही, याबद्दल मार्गदर्शनदेखील मिळवू शकते. ही साधी समस्या कृती करण्यायोग्य साधनामुळे त्याच्यात जागरूकता वाढवते.

आरोग्यविषयत जगजागृती मोहिमेबद्दल बोलताना आयसीआयसीआय लोम्बार्डच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स आणि सीएसआरच्या मार्केटिंग प्रमुख शीना कपूर म्हणाल्या, “विशेषतः जेव्हा प्रतिबंधात्मक आरोग्याचा विचार केला जातो, त्यावेळी आयसीआयसीआय लोम्बार्ड नेहमी सर्जनशीलतेच्या माध्यमातून अर्थपूर्ण बदलाला चालना देणारा घटक म्हणूनच सर्जनशीलतेकडे पाहते. घोरणे हे अनेकदा निरुपद्रवी म्हणून दुर्लक्षित केले जाते, तरीही ते स्लीप एपनियाचे प्रारंभिक लक्षण असू शकते. तो एकप्रकारे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधित गंभीर जोखमींशी जोडला गेलेला आजार आहे. उपचार न केलेल्या स्लीप एपनियाग्रस्त व्यक्तींना हृदयरोग होण्याची शक्यता पाच पट जास्त असते, हे अभ्यासातून समोर आलेले आहे. या मोहिमेद्वारे, आम्ही या अदृश्य धोक्याकडे लक्ष वेधण्यासाठी दररोजच्या जीवनातील सामान्य प्रसंग अतिशय सहजरित्या, वास्तविक आणि प्रेक्षकांशी थेट संबंध जोडतील, अशा पध्दतीने सादर करण्याची आमची भूमिका आहे. कुतूहल जागृत करून आणि लवकरात लवकर उपाययोजनांना प्रोत्साहन देत लोकांना त्यांच्या हृदयाच्या आरोग्यासाठी सक्रियपणे योग्य उपचार निवडीस मदत करणे, हे आमचे ध्येय आहे. या चित्रपटाच्या केंद्रस्थानी एक साधी कल्पना आहे आणि ती म्हणजे प्रतिबंधात्मक काळजी ही भीतीदायक असण्याची गरज नाही. योग्यरित्या ती स्पष्ट केल्यास सुलभ आणि परिणामकारक अशी दोन्ही असू शकते.”

विनोदी शैलीच्या वापरातून कठोर सत्य समोर आणत आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनीच्या भूमिकेच्या पलीकडे जाताना जीवनाला स्पर्श करणाऱ्या उद्देशपूर्ण मोहिमांची परंपरा पुढे कायम सुरु ठेवत आहे. आपल्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला चालना देण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर कंपनीचा ब्रँड भर देतो आणि प्रेक्षकांना आठवण करून देतो की, कधीकधी, अगदी लहान आवाजही सर्वाधिक मोठे इशारे आगाऊ देत असतो.