एमएमआरडीए विरोधात शेतकरी संतप्त, पोलिसांचा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न

12

सामना ऑनलाईन । पालघर

पालघरमध्ये पोलीस आणि प्रशानाची मुजोरी सुरूच आहे. प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून एमएमआरडीने सुरू केलेले सूर्या प्रादेशिक जलवाहिनीचे काम थांबण्यासाठी गेलेल्या आंदोलकांना पोलिसांनी बळाचा वापर करून ताब्यात घेतले आहे. तसेच आंदोलकांवर सरकारी कामात अडथळा केल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्याची देखील कारवाई सुरू केली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न अगोदर सोडावा आणि नंतरच जलवाहिनीचे काम सुरू करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

MMRDAच्या विरोधात शेतकरी आक्रमक, प्रकल्पबाधितांनी काम बंद पाडले

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, एमएमआरडीए, वन विभाग आणि प्रकल्पबाधित शेतकरी यांची संयुक्त बैठक घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न अगोदर सोडावा आणि नंतरच जलवाहिनीचे काम सुरू करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र एका बाजूला शेतकऱ्यांशी बोलणी करण्याचे आश्वासन द्यायचे आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्या मदतीने दडपशाही करून काम सुरू करायचे अशी दुटप्पी भूमिका प्रशासनाने घेतला आहे. तसेच आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केल्यास आंदोलन अधिक तीव्र करणाचा इशारा आदिवासी पुनर्वसन आंदोलन समितीचे अविनाश पाटील यांनी दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या