पुलवामा घटनेनंतर एनएसए अजित डोभाल यांची पंतप्रधान मोदींशी चर्चा

1151
ajit-doval-modi

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे आयईडीच्या माध्यमातून सैनिकांवर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा डाव रचला गेला होता. मात्र पोलीस, सीआरपीएफ आणि सैन्याच्या संयुक्त कामगिरीमुळे हा डाव उधळून लावण्यात आला. पुलवामातील या घटनेची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आली आहे. ही माहिती एनएसए अजित डोभाल यांनी पंतप्रधान मोदींना दिली. गेल्या वर्षी पुलवामामध्येच आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हवाई दलाने बालाकोट येथे हवाई हल्ला केला आणि जैश या दहशतवादी संघटनेचे तळ पाडले.

पुलवामाच्या आयनगुंड भागात सुरक्षा दलांनी सॅन्ट्रो कार जप्त केली. या वाहनात हा आयईडी सापडले, महत्त्वाचे म्हणजे कारवर कठुआचा नंबर लिहिला होता. या कारमध्ये स्फोटकं इतक्या मोठ्या प्रमाणात भरली होती की सुरक्षा दलाला ते उडवून द्यावे लागले.

कार वर जेके-08 1426 नंबर प्लेट होती, हा कठुआचा नंबर आहे. जम्मू संभागमधील सीमेकडील भागात कठुआ हा भाग येतो आणि येथील हीरानगर हा भाग पाकिस्तानी घुसखोरी दृष्टीने संवेदनशील मानला जातो. त्यामुळे या मागे पाकिस्तानचा हात असल्याचे मानले जात आहे.

हिजबुल मुजाहिद्दीन मोठा हल्ला करण्याच्या तयारीत, गुप्तचर यंत्रणांचा इशारा

आपली प्रतिक्रिया द्या