
पिस्तूल बाळगणार्याला विमानतळ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पिस्तूलासह 2 जिवंत राउंड असा 50 हजारांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई खुळेवाडी कॉर्नर परिसरात करण्यात आली.
संतोष शंकर गुंजाळ (26, रा. दगडी हौदाजवळ माळवाडी, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. विमानतळ पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना एकजण पिस्तूल बाळगून थांबल्याची माहिती पोलीस नाईक गिरीश नाणेकर आणि सचिन जाधव यांना मिळाली. त्यानुसार, पथकाने खुळेवाडी परिसरात सापळा रचून संतोष गुंजाळ याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यत आली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, एसीपी आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे, पोलीस निरीक्षक मंगेश जगताप, उपनिरीक्षक रविंद्र ढावरेख, अविनाश शेवाळे, सचिन कदम, सचिन जाधव, उमेश धेंडे, गिरीष नाणेकर, अंकुश जोगदंडे, नाना कर्चे, योगेश थोपटे, संजय आसवले यांनी केली

























































