
तडीपारीची कारवाई केलेली असतानाही सोमवार पेठेत आलेल्या सराईत गुंडाला समर्थ पोलिसांनी अटक केले. कुणाल रावळ (वय – 26, रा. नाना पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
समर्थ पोलीस ठाण्याचे कर्मचारी शाम सूर्यवंशी हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी सोमवार पेठेत तडीपार गुंड कुणाल रावळ आल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते, संतोष काळे, सुशील लोणकर, सुभाष पिंगळे, श्याम सूर्यवंशी, सुभाष मोरे, प्रशांत सरक, हेमंत पेरणे, सचिन पवार, नीलेश साबळे, सुमित खुट्टे, शुभम देसाई, विठ्ठल चोरमले यांच्या पथकाने केली.
























































