धक्कादायक ! बॅडमिंटनचे फूल काढताना बसला विजेचा धक्का, 10 वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॅडमिंटनचे फूल काढत असताना विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने 10 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना लोणी काळभोरमधील कदमवावस्ती ग्रामपंचायत हद्दीतील घोरपडे वस्तीवर घडली आहे. भाग्यश्री धनाजी बनसोडे (10) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील रविवारी भाग्यश्री घराच्या गच्चीवर बॅडमिंटन खेळत होती. त्यावेळी बॅडमिंटनचे फूल गच्चीच्या दुसऱ्या बाजूला पडले होते. ते फूल काढण्यासाठी भाग्यश्री इमारतीच्या गच्चीवर गेली होती. गच्चीवरून गेलेल्या वीजवाहक तारांच्या खाली चार फूट उंचीची भिंत असल्याने, ती शिडीच्या साहाय्याने बॅडमिंटनचे फूल काढत होती. त्यावेळी वीज वाहक तारांच्या संपर्कात आल्याने भाग्यश्री 50 टक्के भाजली गेली.

स्थानिकांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मागील सात दिवसांपासून मृत्यूशी चाललेली तिची झुंज अखेर अपयशी ठरली. भाग्यश्री तिच्या कुटुंबियांसह महादेव खंदारे यांच्या घरात भाड्याने राहिला होती. इमारतीच्या गच्चीवरून वीजवाहक तारा गेल्या आहेत. याविषयीची तक्रार खंदारे यांनी वीज वितरण कंपनीकडे याआधीही केली होती. लेखी तक्रारही केली होती. तरीही याबाबत कोणतीच कारवाई करण्यात आली नव्हती. या घटनेचा पुढील तपास लोणीकाळभोर पोलीस करत आहेत.