पुणे – पिस्तूल बाळगणारा सराईत अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पिस्तुल बाळगणाऱ्या सराईताला पोलिसांनी अरण्येश्वर भागातील तावरे कॉलनीत पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीच्या पिस्तुलासह काडतुस जप्त करण्यात आले. रोहित विजय अवचरे (रा. शाहू वसाहत, लक्ष्मीनगर, पर्वती) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात खुनाचा प्रयत्न, मारामारी, दहशत करणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

रोहित अवचरेला शहरातून एक वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होता. तडीपार केल्यानंतर तो अरण्येश्वर भागात पिस्तुल घेऊन दहशत निर्माण करण्यासाठी येणार असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी अक्षयकुमार वाबळे, नवनाथ भोसले आणि कुंदन शिंदे यांना मिळाली. त्यानंतर त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्तुलासह एक काडतुस जप्त करण्यात आले. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, सुधीर घोटकुले, महेश गाढवे, अमित सुर्वे, सागर सुतकर, राहुल ओलेकर यांच्या पथकाने केली.