पुणे – हडपसरमध्ये जेष्ठाच्या डोक्यात दगड मारुन खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime-spot

हडपसर परिसरातील माळवाडीत एकाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. शेतकऱ्याला त्याच्या शेतात मृतदेह आढळल्यानंतर त्याने याची माहिती पोलिसांना दिली. दत्तात्रय साहेबराव कांबळे (57, रा. माळवाडी, हडपसर) असे खुन झालेल्याचे नाव आहे. याबाबत त्यांच्या पत्नीने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय यांना दारूचे व्यसन होते. ते बुधवारी दुपारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर ते घरी परतले नाही. आज सकाळी कांबळे यांच्या घराच्या बाजूला त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.

”प्राथमिक तपासानुसार किरकोळ वादातून जेष्ठाच्या डोक्यात दगड मारुन खून केल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी तपास सुरु असून लवकरच आरोपींना पकडण्यात येईल.” – बाळकृष्ण कदम, हडपसर पोलीस ठाणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक