पुणे – तीन वर्षांपासून फरार असलेल्या सराईत अल्पवयीन ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

शहरातील स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकावर शस्त्राने वार करून मागील तीन वर्षांपासून फरार असलेल्या अल्पवयीन सराईताला स्वारगेट पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. स्वारगेट पोलिसांचे तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, तीन वर्षांपुर्वी गुन्ह्यातील फरार सराईत अल्पवयीन गुलटेकडीत आल्याची माहिती पोलीस शिपाई ज्ञाना बडे आणि मनोज भोकरे यांना मिळाली.

पथकाने सापळा रचून अल्पयीन आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीशक अमोल रसाळ ,पोलीस उपनिरीक्षक संजय आदलिंग,पोलिस अंमलदार विजय कुंभार, लखन धावरे ,ऋषी तिथमे,शैलेश वाबळे, वैभव शीतकाळ, शंकर गायकवाड ,संदीप साळवे,सोमनाथ कांबळे ,ज्ञाना बडे ,मनोज भोकरे यांच्या पथकाने केली आहे.