Pune crime मौजमजेसाठी वाहनचोरी, सराईताकडून चार वाहने जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मौजमजेसाठी शहर परिसरातून महागडी दुचाकी वाहने चोरणार्‍या सराईताला दत्तवाडी पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून चोरीची चार वाहने जप्त करण्यात आली आहेत.

रोहीत विष्णू क्षीरसागर (वय – 22, रा. जनता वसाहत, मूळ. रा. लातूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

दत्तवाडी पोलिसांचे पथक हद्दीत गस्तीवर होते. या दरम्यान दुचाकी चोरणारा संशयीत हा जनता वसाहत परिसरात थांबल्याची माहिती पथकाला मिळाली. यानूसार क्षीरसागर याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने वाहनचोरीचे गुन्हे केल्याची कबूली दिली. त्याच्याकडून चार चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तर, दत्तवाडी आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे उघड झाले आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार प्रमोद भोसले, पुरुषोत्तम गुन्ला, दयानंद तेलगे पाटील, कुंदन शिंदे, सद्दाम शेख, नवनाथ भोसले यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.