पोलीस असल्याच्या बतावणीने केली जबरी चोरी, शिवाजीनगर पोलिसांकडून आरोपींना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पोलीस असल्याची बतावणी करून लुटमार करणार्‍या दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी दोन तासात अटक केली. त्यांच्याकडून चार मोबाईल, मोबाइल असा 65 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही घटना18 डिसेंबरला रात्री एकच्या सुमारास घडली होती.

श्रीकांत भरत कदम (वय – 32, रा. पांडवनगर) आणि सुरज राजु धोत्रे (वय – 32, रा. जुनी वडारवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. रक्षाराम बचराज वर्मा यांनी तक्रार दिली आहे.

जबरी चोरीच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे हे पथकासह आरोपींचा शोध घेत होते. गुन्ह्यातील आरोपी वडारवाडी पसितरात थांबल्याची माहिती सहायक पोलीस फौजदार अविनाश भिवरे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विक्रम गोड, सहायक पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, उपनिरीक्षक अर्जुन नाईकवाडे, अविनाश भिवरे, गणपत वाळकोळी, बशीर सय्यद, रणजित फडतरे, सुरेंद्र साबळे, सतीश खुरंगे, आदेश चलवादी यांनी केली.