लघुशंकेसाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने हल्ला, मारहाण करून मोबाइल हिसकाविला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लघुशंका करण्यासाठी थांबलेल्या तरुणावर कोयत्याने हल्ला करीत दुचाकीस्वार तिघा चोरट्यांनी त्याच्याकडील 5 हजारांचा मोबाइल हिसकावून नेला. ही घटना 9 डिसेंबरला रात्री पावणेनऊच्या सुमारास हडपसरमधील कात्रज मंतरवाडी परिसरात घडली. याप्रकरणी 38 वर्षीय तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

फिर्यादी तरुण 9 डिसेंबरला कात्रज मंतरवाडी परिसरातून निघाले होते. लघुशंका करण्यासाठी ते थांबले असता, दुचाकीस्वार तिघा चोरट्यांनी त्यांना अडविले. कोयत्याने मारहाण करीत त्यांच्याकडील पाच हजारांचा मोबाइल हिसकावून नेला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके तपास करीत आहेत.