जादा व्याजदराच्या आमिषाने पती-पत्नीला 65 लाखांना गंडा, 34 जणांची फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जादा व्याजदर देण्याच्या आमिषाने एकाने पती-पत्नीला तब्बल 65 लाखांचा गंडा घातला आहे. त्याशिवाय आणखी 34 जणांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. ही घटना नोव्हेंबर 2014 ते जानेवारी 2021 कालावधीत घडली.

याप्रकरणी पंकज भागचंद छल्लाणी (रा. मुंकुंदनगर, पुणे ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी रिचर्ड अंची (वय – 58, रा. भोसलेनगर) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी पंकज आणि रिचर्ड यांची मित्राकडून ओळख झाली होती. त्यानंतर पंकजने रिचर्डसह त्यांच्या पत्नीचा विश्वास संपादित केला. त्यांना जादा दराने व्याज देण्याच्या आमिषाने गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानुसार रिचर्ड यांनी पंकजच्या सांगण्यानुसार 65 लाखांची गुंतवणूक केली. त्यानुसार पंकजने फेब्रुवारी 2018 पर्यंत त्यांना व्याज दिले. मात्र, मार्च 2018 पासून व्याज आणि ठेव परत न देता फसवणूक केली. त्याशिवाय पंकजने 34 नागरिकांना 18 ते 24 टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांनी दिली.