
गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे शहरातील विविध भागात वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. त्याशिवाय मध्यवर्ती भागात बहुतांश रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गासह रिंगरोडचा वापर करावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.
9 सप्टेंबर सकाळी नऊ वाजेपासून वाहतूकीसाठी बंद रस्ते (विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत)
शिवाजी रोड – काकासाहेब गाडगीळ पुतळा जंक्शन ते जेधेचौक लक्ष्मी रोड- संत कबीर चौकी ते अलका टॉकीज चौक बगाडे रोड- सोन्या मारूती चौक ते फडके हौद चौक बाजीराव रोड – बजाज पुतळा चौक ते फुटका बुरूज चौक कुमठेकर रोड- टिळक चौक ते चितळे कॉर्नर चौक गणेश रोड – दारूवाला पुल ते जिजामाता चौक केळकर रोड- बुधवार चौक ते अलका टॉकीज चौक गुरु नानक रोड – देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक ते गोविंद
हलवाई चौक
टिळक रोड जेधे चौक ते टिळक चौक
शास्त्री रोड – सेनादत्त चौकी चौक ते अलका टॉकीज चौक जंगली महाराज रोड – झाशी राणी चौक ते खंडोजी बाबा चौक कर्वे रस्ता- नळ स्टॉप चौक ते खंडोजी बाबा चौक फर्ग्युसन रोड-खंडोजी बाबा चौक ते फर्ग्युसन कॉलेज मेनगेट भांडारकर रस्ता -पी.वाय. सी जिमखाना ते गुडलक नटराज चौक
पुणे सातारा रोड- व्होल्गा चौक ते जेधे चौक
सोलापुर रोड- सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौक प्रभात रोड- डेक्कन पोस्टे ते शेलारमामा चौक चौक
वाहतूक वळविण्यात आलेले रस्ते जंगली महाराज रोड-झाशी राणी चौक, शिवाजी रोड- स. गो. बर्वे चौक / गाडगीळ पुतळा मुदलीयार रोड-अपोलो टॉकीज नेहरु रोड- संत कबीर पोलीस चौकी सोलापूर रोड – सेव्हन लव्हज चौक सातारा रोड – व्होल्गा चौक, बाजीराव रोड-पुरम चौक, लाल बहादुर शास्त्री रोड- सेनादत्त पोलीस चौकी कर्वे रोड नळस्टॉप फर्ग्युसन कॉलेज रोड- गुडलक चौक
खालील रिंगरोडचा वापर करावा
कर्वे रोड नळस्टॉप चौक- लॉ कॉलेज रोड- सेनापती बापट रोड- सेनापती बापट रोड जंक्शन गणेशखिंड रोड सिमला ऑफिस चौक – संचेती हॉस्पीटल चौक – इंजि. कॉलेज चौक- आंबेडकर रोडवरील शाहिर अमर शेख चौक- मालधक्का चौक – बोल्हाई चौक – नरपतगिरी चौक नेहरु रोडवरुन संतकबीर पोलीस चौकी सेव्हन लव्हज चौक – वखार महामंडळ चौक- शिवनेरी रोडवरुन गुलटेकडी मार्केटयार्ड – मार्केटयार्ड जंक्शन सातारा रोडने व्होल्गा चौक – सिंहगड रोडने मित्रमंडळ चौक- सावरकर चौक- सिंहगड रोड जंक्शन – लाल बहादुर शास्त्री रोडने सेनादत्त पोलीस चौकी, अनंत कान्हेरे पथावरुन म्हात्रे पुल ते नळस्टॉप रस्त्याने मार्गस्थ व्हावे.
नो-पार्किंग
लक्ष्मी रोड 2. केळकर रोड 3. कुमठेकर रोड 4. टिळक रोड व 5. शास्त्री रोड 6. फर्ग्युसन रोड खंडोजीबाबा चौक ते हॉटेल वैशाली येथे 100 मीटर परिसरात पार्किंग करीता बंदी करण्यात आली आहे.
गणेश विसर्जन मिरवणूकीच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी वाहतूक बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी वाहतूक पोलिसांनी सहकार्य करून सहकार्य करावे. रिंगरोडचा वापर करून वाहतूककोंडी टाळावी.
– राहुल श्रीरामे, वाहतूक उपायुक्त, पुणे

























































