
सहकारी डॉक्टर महिलेचे अश्लिल छायाचित्रण करण्यासाठी भारती विद्यापीठ हॉस्पीटलमधील बाथरुममध्ये छुपे कॅमेरे लावणाऱ्या प्रतिष्ठीत एमडी डॉक्टरला भारती विदयापीठ पोलिसांनी अटक केली आहे. डॉ. सुजित आबाजी जगताप (वय – 42, रा. सिंहगड रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. न्यायालयाने डॉक्टरला दोन दिवस पोलीस कोठडी सुनाविली आहे.
आरोपी जगताप हा एमडी डॉक्टर असून त्याचा हिराबाग येथे मोठा दवाखाना आहे. तसेच तो भारती हॉस्पिटलमध्ये शिकविण्यासाठी जात होता. त्याने अॅमेझॉनवरुन छुपा कॅमेरा असलेला बल्प खरेदी केला होता.
दरम्यान, भारती विद्यापीठ कॅम्पस (धनकवडी) मध्ये सहा जुलैला महिला डॉक्टरांच्या बाथरुममध्ये कोणीतरी बनावट चावीच्या सहाय्याने कुलूप उघडून बेडरुम व बाथरुममध्ये छुपा कॅमेरा लावला होता. हा प्रकार संबंधीत डॉक्टर महिलेच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपीचा शोध घेत असताना डॉ. सुजित जगताप याच्यावर पोलिसांना संशय आला. त्याला ताब्यात घेऊन तपास केला असता बाथरूममध्ये छूपा कॅमेरा लावल्याची कबुली दिली.
ही कारवाई उपायुक्त सागर पाटील, एसीपी सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगिता यादव, पोलीस निरीक्षक प्रकाश पासलकर यांच्या मार्गदर्शनाखाली रविन्द्र भोसले, रविंद्र चिप्पा, जगदिश खेडकर, सचिन पवार, सर्फराज देशमुख, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, गणेश शेंडे, राहूल तांबे, विक्रम सावंत, आशिष गायकवाड, योगेश सुळ, सचिन गाडे, निलेश खोमणे, समिर बगशिराज, शिवदत्त गायकवाड, प्रविण सपकाळ, गणेश सुतार, तुळशीराम टेभुर्णे, प्रसाद टापरे, संतोष खताळ यांनी केली.


































































