
रस्त्याने पायी चाललेल्या पादचाऱ्याचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्याने त्याच्याकडील पाच हजारांचा मोबाइल हिसकावून नेला. ही घटना 14 जूनला रात्री साडेअकराच्या सुमारास साधु वासवानी ते नेहरू चौकात घडली.
प्रमोद राउत (वय 38 रा. साधु वासवानी चौक) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी प्रमोद रस्त्याने घरी चालले होते. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्याकडील पाच हजारांचा मोबाइल हिसकावून नेला. आरडाओरड करेपर्यंत चोरटा पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव तपास करीत आहेत.

































































