
पुण्यातील बुधवार पेठेतील स्टेशनरी दुकानासह बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 90 हजारांचा ऐवज चोरुन नेला. या घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडल्या आहेत. याप्रकरणी भावेश संजय शहा (वय 33, रा. मुकुंदनगर) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भावेश यांचे बुधवार पेठेत राजयोग स्टेशनरीचे दुकान आहे. शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून 30 हजारांची रोकड चोरुन नेली. दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील 60 हजार रुपये किंमतीचे दोन तोळ्याचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणी अभिराम साईराम जाधव (वय 42) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस या दोन्ही प्रकरणी तपास करत आहेत.

































































