ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खोटे आमिष दाखवून प्लॉटधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एम. देशपांडे यांनी फेटाळून लावला आहे.

मुळशी तालुक्यातील डोंगरगाव, होतले येथील विविध जमीन गटांची बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी गोखले यांच्यासह सुजाता फार्म लिमिटेड या पंपनीचे संचालक जयंत म्हाळगी, सुजाता म्हाळगी या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका 57 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे.

आरोपींनी मुळशीतील ‘गिरीवन’ नावाचा प्रकल्प सरकारमान्य आहे असे भासवले. त्या आधारे ग्राहकांना आकर्षित केले व तक्रारदार यांच्यासह 14 जणांची 1 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमुद केले आहे. याप्रकरणी अटकपूर्व जमीन मिळावा यासाठी गोखले यांनी अॅड. ऋषीकेश गानू आणि अॅड. उपेंद्र खरे यांच्यामार्फत जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यात मार्चमध्ये यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. गोखले हे कंपनीचे अध्यक्ष असल्याची बाब पंपनीच्या मेमोरेंडम ऑफ असोसिएशनमध्ये दिसून येत नाही. तसेच त्यांची ग्राहकांच्या खरेदीखतावर स्वाक्षरी नाही. तसेच त्यांनी गुंतवणूकदारांकडून पुठलाही मोबदला स्वीकारला नाही. एफआयआरमधील कोणत्याही आरोपांशी गोखले यांचा संबंध नसल्याचा युक्तिवाद अॅड. गानू यांनी केला होता.

गोखले यांच्या जामीन अर्ज सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी विरोध केला. गोखले हे संबंधित कंपनीचे अध्यक्ष असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुह्यात गुंतवणूकदारांची फसवणूक झालेली रक्कम मोठी आहे. गोखले यांचा या गुह्यात सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे, त्यामुळे पुढील तपासासाठी त्यांचा अर्ज फेटाळण्यात यावा असा युक्तिवाद अॅड. सप्रे यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने अर्ज फेटाळला. सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने उच्च न्यायालयात अर्ज करण्यास मुदत मिळावी, अशी विनंती बचाव पक्षाकडून न्यायालयात करण्यात आली होती. त्यामुळे न्यायालयाने या निकालास 17 ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिलेली आहे.