
वारजे माळवाडी परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईताविरुद्ध एमपीडीए अॅक्टनुसार एक वर्ष स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. गंग्या उर्फ विकी विष्णू आखाडे (वय 24, रा. वारजे माळवाडी ) असे कारवाई करण्यात आलेल्याचे नाव आहे.
गंग्या उर्फ विकी सराईत गुन्हेगार असून मागील पाच वर्षांत त्याच्याविरूद्ध 6 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके आणि पोलीस निरीक्षक अमृत मराठे यांनी गंग्या उर्फ विकी विरोधात एमपीडीएनुसार कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला होता. त्या प्रस्तावाला पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार सराईत गंग्या उर्फ विकीला एक वर्षांसाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी संघटीत गुन्हेगारी, गुन्हेगारी टोळ्याविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार मागील सात महिन्यांत 19 गुन्हेगारांविरूद्ध एमपीडीए अॅक्टनुसार कारवाई केली आहे. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.

































































