
भांडणाच्या रागातून टोळक्याने झेरॉक्स दुकानदारावर खुनी हल्ला करीत जखमी केले. त्याशिवाय त्यांच्या दुकानाची तोडफोड करून नुकसान केले. ही घटना १४ सप्टेंबरला रात्री नउच्या सुमारास पाषाणमधील साई चौकात घडली.
राजू मानवतकर (वय 20), चंदू खेतावत (वय 20), किशोर गोपी मेघावत (वय 20), नितीन उर्फ बया मेघावत (वय 20), नितीन वैद्य (वय 25) यांच्यासह इतर सहा ते आठ जणांविरूद्ध चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप विलासराव तुपे (वय 40) असे जखमीचे नाव आहे.
फिर्यादी संदीप यांचे साई चौकात झेरॉक्सचे दुकान आहे. त्यांची आरोपींसोबत काही दिवसांपूर्वी भांडणे झाली होती. त्याच रागातून टोळक्याने 14 सप्टेंबरला रात्री नउच्या सुमारास संदीपच्या डोक्यात दगडाने मारहाण करून गंभीररित्या जखमी केले. दुकानातील साहित्यांची तोडफोड करून नुकसान केले. परिसरात आरडाओरड करून दहशत माजविली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संतोष कोळी तपास करीत आहेत.




























































