मणिपूरमधील व्हिडीओ व्हायरल केल्यास शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मणिपूरमधील हिंसक घटना, मालमत्तांचे नुकसान यांचे व्हिडीओ आणि पह्टो समाजमाध्यमांद्वारे पसरवल्यास कठोर कारवाई आणि शिक्षेला सामोरे जावे लागेल, असे आदेश मणिपूर सरकारने जारी केले आहेत. एका व्हिडीओत, दोन युवकांना जवळून गोळ्या घालून एका जमावाने खड्डय़ात पुरल्याचे दिसत आहे. अशा प्रकारच्या घटनांचे पह्टो आणि व्हिडीओ पसरवण्याचा सोशल मीडियावरील झपाटा रोखण्यासाठी राज्य सरकारने हे आदेश बुधवारी रात्री जारी केले. राज्यातील परिस्थिती पूर्ववत व्हावी यासाठी हा आदेश अमलात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.