अख्खं गाव बंधाऱ्यावर पोहोचलं, गोदावरीतून जायकवाडीला पाणी देण्यास विरोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, शिर्डी

नगर नाशिकमधल्या धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशानंतरही या दोन जिल्ह्यातील शेतकरी, नागरिकांचा पाणी सोडण्यास विरोध कायम असल्याचं बघायला मिळतंय. शुक्रवारी पुणतांब्यात अख्खं गाव बंधाऱ्यावर पोहोचलं आहे. आज गोदावरी नदीतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात येणार आहे. याला विरोध करण्यासाठी हे गावकरी एकत्र आले आहेत. आम्ही बंधाऱ्याचं रक्षण करणार असून इथून पाणी सोडायला देणार नाही अशा इशारच गावकऱ्यांनी दिला आहे. साखळी करून बंधाऱ्यावर उभ्या राहिलेल्या गावकऱ्यांमुळे पाणी सोडण्यात अडचणी येणार आहेत. इथे बळाचा वापर झाला तर परिस्थिती चिघळण्याची दाट शक्यता आहे.