
अयोध्येतील ऐतिहासिक राममंदिर उभारणीच्या तयारीला वेग आला आहे. मंदिर उभारणीसाठी स्थापन केलेल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने अयोध्येत जवळपास 1.15 लाख चौरस फूट जमीन खरेदी केली आहे. ही जमीन रामजन्मभूमीपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे. भक्त व सुरक्षा बलांसाठी सुविधांचा विस्तार तसेच ट्रस्टच्या विविध उपक्रमांसाठी या जमिनीचा वापर केला जाईल, असे ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले. अयोध्येतील राम कोट आणि टिहरी बाजार परिसरात जमिनीचे दोन प्लॉट्स आहेत. गेल्या आठवड्यात बस्ती जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या हरीश कुमार पाठक यांच्याकडून या जमिनीची खरेदी करण्यात आली.




























































