पिछेवाले बाबू हेल्मेट लगा लो! रेडिओ सिटीचे RJ ट्राफिक पोलिसांच्या मदतीसाठी उतरले रस्त्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत दुचाकीची वाढती संख्या आणि दुचाकीचे झालेले सर्वाधिक अपघात पाहता दुचाकीवर पाठीमागे बसणाऱ्यांना हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. असे असतानाही मागे बसणारी व्यक्ती हेल्मेट घालत नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी रेडिओ सिटीने पुढाकार घेतला आहे.

दुचाकीस्वार मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई पोलिसांनी हेल्मेटसक्तीचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी वांद्रे कार्टर रोड येथे रेडिओ सिटी आणि मुंबई ट्राफिक पोलिसांनी मुंबईकर दुचाकीस्वारांना हेल्मेटचे मोफत वाटप केले. यावेळी रेडिओ सिटीचे आरजे उपस्थित होते.

रेडिओ सिटीने मुंबई ट्राफिक पोलिसांसह हेल्मेट वापराची मोहीम मुंबईच्या रस्त्यावर राबवली. `पिछेवाले बाबू हेल्मेट लगा लो’ म्हणत हेल्मेट वापरण्याचे आवाहन रेडिओ सिटीचे आरजे मुंबईकरांना करत होते. यावेळी मुंबई ट्राफिक पोलिसांनी व रेडीओ सिटीच्या आरजेंनी विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकी प्रवाशांना मोफत हेल्मेट वाटपही केले.