‘मेक इन इंडिया’ला ‘या’ देशाने दिली साथ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
florence-parly

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ या धोरणावर अधिक भर दिला आहे. मेक इन इंडिया अंतर्गत देशात अधिकाधिक उत्पादने बनावी, रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात या उद्देशाने हे धोरण राबवण्यात येत आहे. कोरोनाच्या महामारीच्या काळात ‘आत्मनिर्भर भारत’ची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ या धोरणाला फ्रांसने साथ दिली. फ्रांसच्या संरक्षण मंत्री फ्लोरेंस पार्ले यांनी आज दिलेल्या निवेदनात हे स्पष्ट केले आहे. ‘मेक इन इंडिया’ या धोरणाला साथ देण्यास आम्ही कटीबद्ध असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

फ्रांसमधून आलेले लढाऊ ‘राफेल’ जेट विमान गुरुवारी अधिकृतरित्या हिंदुस्थानच्या हवाई दलात सहभागी झाले. त्यानंतर फ्रांसच्या संरक्षण मंत्र्यांची प्रतिक्रिया आली आहे. या औपचारिक कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या हिंदुस्थानमध्ये दाखल झाल्या आहेत.