
भाजपला देशाची संपत्ती निवडक लोकांच्या हातात जावी असे वाटते, असं विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले आहेत. कर्नाटकमधील समर्पण संकल्प रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी असं म्हणाले आहेत.
राहुल गांधी म्हणाले आहेत की, “आम्ही तुम्हाला सांगितले होते की, आम्ही कर्नाटकातील गरीब लोकांच्या बँक खात्यात पैसे टाकू आणि आज हजारो कोटी रुपये तुमच्या बँक खात्यात जात आहेत. तुम्ही हे पैसे तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी गुंतवत आहात. आम्हाला फक्त एवढेच हवे होते की, तुमचे पैसे तुमच्या खिशात परत जावेत. भाजपला देशाची संपत्ती निवडक लोकांच्या हातात जावी असे वाटते आणि आम्हाला कर्नाटकातील लोकांच्या खिशात पैसे जावे असे वाटते.”
ते म्हणाले, “जेव्हा आम्ही तुमच्या खिशात पैसे टाकतो तेव्हा ते पैसे बाजारात जातात. यामुळे लोक त्यांच्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये पैसे खर्च करतात. म्हणून उत्पादन वाढते, ज्यामुळे कर्नाटकच्या अर्थव्यवस्थेला फायदा होतो. भाजप मॉडेलमध्ये,निवडक लोकांना पैसे दिले जातात, जे पैसे खर्च करतात आणि हिंदुस्थानात न राहता परदेशात मालमत्ता खरेदी करतात.”
हमने आपसे कहा था कि हम कर्नाटक के गरीब लोगों के बैंक खातों में पैसा डालेंगे और आज हजारों करोड़ रुपए आपके बैंक खातों में जा रहे हैं।
ये पैसा आप अपने बच्चों की शिक्षा और परिवार के स्वास्थ्य में डाल रहे हैं। हम यही चाहते थे कि आपका धन वापस आपकी जेब में जाए।
BJP चाहती है कि देश… pic.twitter.com/GZvD2DpkqR
— Congress (@INCIndia) May 20, 2025