नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरीत संततधार

62

सामना ऑनलाईन | नाशिक

नाशिक परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून संततधार पावसाला सुरुवात झाली आहे. शनिवारी दिवसभर अधुनमधून पावसाच्या सरी सुरूच होत्या. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी परिसरातही समाधानकारक हजेरी होती, यामुळे भात लावणीला गती आली आहे.

शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तुरळक पाऊस होता. शुक्रवारी मध्यरात्रीपासून संततधार पावसाला सुरुवात झाली, शनिवारीही तो तसाच सुरू होता. त्यानंतर अधुनमधून सरी बरसल्या. त्र्यंबकेश्वर, इगतपुरीतही चांगली हजेरी लावल्याने भात लावणीला गती आली. हा पाऊस असाच सुरू राहील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या दोन्ही तालुक्यात जोरदार पाऊस झाला तरच तेथील धरणे भरतील. नाशिकला पाणीपुरवठा करणाऱया गंगापूर आणि मुकणे, तसेच दारणा धरणाच्याही पाणी पातळीत वाढ होईल. जिह्याच्या अन्य काही तालुक्यांनाही याच धरणांच्या पाण्याचा आधार आहे. जिह्यात पेठ, सुरगाणा, हरसूल येथेही पावसाची संततधार सुरूच होती.

 

आपली प्रतिक्रिया द्या