आमिर खान हाजिर हो..! असहिष्णुता टिप्पणीमुळे न्यायालयीन नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेता अमीर खानच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 2015 मध्ये असहिष्णुता विधानासंबंधीत राजपूर न्यायालयाने आमिरला मंगळवारी 19 जूनला न्यायालयात उपस्थित राहण्याची नोटीस जारी केली आहे. ही याचिका या आधी तांत्रिक आधारांवर फेटाळण्यात आली होती.

याचिकाकर्ते दिपक दिवाणी यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ सोबत संवाद साधताना आपले मत मांडले. यावेळी ते म्हणाले, संजय पोपटानी यांनी विशेष न्यायाधीश लीना अग्रवाल यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती. यासंबंधीत त्यांनी तक्रारीची नोंद केली असून पुढच्या सुनावणीसाठी 19 जून ही तारीख निश्चित केली. यावेळी त्यांनी अभिनेता आमिर खानच्या टिप्पणीनंतर किरण राव यांनी असहिष्णुतेमुळे हिंदुस्थान सोडण्याचा दिलेला सल्ला ऐकून धक्का बसला असल्याचे सांगितले.

दिवाणी यांनी 2015 मध्ये कोर्टात याचिका दाखल केली होती. परंतु न्यायालयाने ती फेटाळली होती. 2016 मध्ये त्यांनी पुन्हा एका कनिष्ठ न्यायालयात अपील केले असून पुढच्या सुनावणीत आमिर खानचीची उपस्थिती अपेक्षित असल्याचे सांगितले.