कुडाळ तालुका सरपंच संघटना अध्यक्षपदी राजन परब; सचिवपदी अजित परब यांची निवड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुडाळ तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी राजन रामचंद्र परब (कसाल सरपंच) तर सचिव पदी अजित परब (वसोली सरपंच) यांची एकमताने निवड करण्यात आली. कुडाळ पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील सरपंचाची सभा बुधवारी सकाळी झाली. यावेळी या सरपंच संघटना कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली सर्व पक्षिय सरपंच संघटना कुडाळ सरपंचानी काढून जिल्हात आदर्श घालून दिला. आतापर्यंत तालुका वार संघटना तयार झाल्या पण त्या कोणत्या तरी पक्षाची बांधील राहुन स्थापन करण्यात आल्या परंतु कुडाळ तालुका सरपंच संघटना ही पक्ष विरहीत स्थापन करून एक आदर्श घालून दिला. सरपंचांच्या समस्या शासन दरबारी मांडता याव्यात, नवीन सरपंचांना मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित करणे, सरपंचांना जानून बुजून कोण त्रास देत असेल तर सरपंचांच्या ठामपणे उभे राहने विशेषतः महीला सरपंचांना नाहक त्रास सहन करावा लागतो त्यांच्या पाठीशी उभे राहने, कामकाजात एकमेकांना मदत करणे या उद्देशाने संघटनेची स्थापना केली आहे असे राजन परब यांनी सांगितले.

उपाध्यक्ष- शितल शंकर कल्याणकर, (कडावल सरपंच) सह सेक्रेटरी- सृष्टी सुरज कुडपकर ( बिबवणे सरपंच) खजिनदार- अजय सत्यवान आकेरकर ( पिंगुळी सरपंच) सल्लागार- कीर्ती कुमार तेरसे ( निरुखे सरपंच) मिलिंद नाईक ( तुळसुली सरपंच). कार्यकारणी सदस्य- परशुराम परब, महेंद्र पिंगुळकर, दक्षता मेस्त्री, सोनल शिरोडकर, कावेरी चव्हाण, साधना परब, मनिषा भोसले, पूर्वा सावंत, भक्ती घाडीगावकर, वैशाली पावसकर यांची निवड करण्यात आली.