
104 वर्षांचा इतिहास असणाऱ्या राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक सध्या संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेकडून कर्ज न घेतलेल्या अनेक नागरिकांना कर्ज घेतल्याच्या तर काहींना जामीन राहिल्याच्या नोटीसा आल्याने एकच गोंधळ उडाला आहे. सहाय्यक निंबधक कार्यालयात सुनावणीदरम्यान आलेले नागरिक संतापले. वातावरण तापल्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. त्यानंतर काही मंडळींनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली.
राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे कर्ज घेऊन थकीत असल्याबाबतच्या नोटीसा काढण्यात आल्या आहेत. काहींना जामीन असल्याबद्दल नोटीसा काढण्यात आल्या आहेत.अनेकांनी आपण कर्जचं घेतले नाही.तर काहींनी आपण जामीन राहिलो नाही अशा तक्रारी सहाय्यक निंबधक कार्यालयात मांडल्या.यापूर्वी तक्रारदारांनी १५ ऑगस्टला आंदोलन केले होते.
बॅंक प्रशासन गप्प
104 वर्षांचा इतिहास असलेल्या राजापूर को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या बाबत आता खातेदारांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू आहे.सहाय्यक निंबधक कार्यालातही खातेदारांनी संताप व्यक्त केला. अनेक जणांनी आपण कर्ज घेतली नसल्याचे सांगितले आहे. मात्र राजापूर अर्बन को- ऑपरेटिव्ह बॅंकेने आपल्या सभासद, ठेवीदारांना तसेच नागरिकांना नक्की काय घडलयं, हे सांगितलेले नाही.