काँग्रेस नेते सचिन पायलट म्हणतायत; ‘जीना यहां मरना यहां’, पाहा व्हिडीओ…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थानमधील काँग्रेस नेते सचिन पायलट यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सचिन पायलट हे ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटातील ‘जीना यहां मरना यहां’ हे गीत गाताना दिसत आहेत. हा व्हिडीओ ट्विटवर अपलोड करण्यात आला असून तो आता तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका काँग्रेस नेत्याच्या धर्मादाय कार्यक्रमात टिपण्यात आपल्याच समजते आहे. या गीताद्वारे सचिन पायलट यांनी आपल्या पक्षांतर्गत असलेल्या विरोधकांना मेसेज दिला असल्याचे बोलले जाते आहे.

‘एबीपी न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, अलीकडेच सचिन पायलट यांच्याकडे काँग्रेसने संघटनेची जबाबदारी सोपवली आहे. अशा परिस्थितीत सचिन पायलट यांना लवकरच राज्य ऐकवजी देश पातळीवली जबाबदारी देत राजस्थानमधून त्यांना दिल्लीत बोलावले जाईल, अशी संभावना त्यांच्या पक्षातील विरोधी नेत्यांनी वर्तवली होती. अशा स्थितीत जे लोक आपल्या मनात असा अंदाज बांधत होते त्यांना या गाण्यातून पायलट यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

या कार्यक्रमादरम्यान सचिन पायलट म्हणाले की, ‘पुढील 50 वर्षे मी कुठेही जाणार नाही.’ दरम्यान, सचिन पायलटने यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करताच तो व्हायरल होऊ लागला. सचिन पायलटचे चाहते त्याच्या गायकीचे कौतुक करताना दिसत आहेत.