
वैष्णवी शशांक हगवणे यांनी 16 मे रोजी मुळशी तालुक्यातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. राज्याला चर्चा होत असलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. वैष्णवीचा तिच्या सासरी संशयास्पद मृत्यू झाला होता. प्राथमिक माहितीनुसार, तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता, असा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे.
शुक्रवारी पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास पुण्यातील स्वारगेट परिसरातून त्यांना अटक केली आहे. गेल्या आठ दिवसांपासून फरार असलेल्या या दोघांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची सहा पथकं कार्यरत होती. अटकेनंतर स्वारगेटमधील ज्या हॉटेलमध्ये हे दोघं थांबले होते, तिथले सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले आहे. वैष्णवी शशांक हगवणे यांनी 16 मे रोजी मुळशी तालुक्यातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या फिर्यादीत सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप केला होता. यामुळे वैष्णवीने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना यापूर्वीच अटक केली असून, त्यांना 26 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
वैष्णवीच्या कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. वैष्णवीच्या लग्नात तिच्या माहेरकडून 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडी देण्यात आली होती. तरीही सासरच्या मंडळींनी दोन कोटी रुपयांच्या अतिरिक्त हुंड्याची मागणी करत तिचा छळ केल्याचा दावा आहे. सर्व आरोपींविरुद्ध ठोस पुरावे गोळा करण्याचं काम पोलिसांकडून सुरु आहे.