महाराष्ट्र शिवसेना प्रमुखांसारख्या महापुरुषांची भूमी – राजनाथ सिंग

67

सामना प्रतिनिधी । अमरावती

महाराष्ट्र संतांचीच भूमी नव्हे तर महापुरुषांची सुद्धा भूमी आहे. महाराष्ट्रात संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या सोबतच छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही जन्म महाराष्ट्रात झाला आहे. अशा या महापुरुषांच्या महाराष्ट्रात भाजपतर्फे ‘महाजानदेश यात्रा’ काढण्यात येत आहे. गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाचा संदेश देण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांनी केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मोझरी येथे भाजपच्या आजपासून महाजनादेश यात्रेला सुरुवात झाली. त्याचे उदघाटन राजनाथ सिंग यांच्या हस्ते झाले. राजनाथसिंग यांनी प्रथमच राष्ट्र संतांच्या समाधीचे दर्शन घेतले. या ठिकाणचे वातावरण पाहून भारावून गेलेल्या राजनाथसिंग यांनी आपल्या भाषणातून महाराष्ट्रातील संत महात्म्यांच्या व महापुरुषांचा आवर्जून उल्लेख केला.गितले.

आपली प्रतिक्रिया द्या