राज्यसभेसाठी भाजप उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर खडसेंची पहिली प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यसभेसाठी होऊ घातलेल्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील तीन उमेदवारांची घोषणा केली आहे. मंगळवारी रामदास आठवले आणि उदयनराजे भोसले यांची नावे जाहीर झाली होती, तर बुधवारी डॉ. भागवत कराड यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. तिसऱ्या जागेसाठी माजी महसूलमंत्री आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याही नावाची चर्चा सुरू होती. मात्र त्यांच्या नावाची घोषणा झाली नाही. तिसऱ्या जागेसाठी कराड यांचे नाव जाहीर झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे.

भारतीय जनता पक्षाकडून मला राज्यसभेसाठी उमेदवारी मिळेल अशी मला अपेक्षा नव्हती. मला केवळ राज्याच्या राजकारणामध्ये रस आहे. त्यामुळे त्यामुळे राज्यसभेसाठी जाहीर झालेल्या उमेदवाऱ्यांबाबत कुठलेही आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, असे एकनाथ खडसे म्हणाले.

राज्यसभेसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील तिसऱ्या जागेचा पेच संपला

दरम्यान, राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठी 26 मार्च रोजी निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख शुक्रवार, 13 मार्च आहे. महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनी याआधी उमेदवारी दाखल केली आहे, तर गुरुवारी उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांनीही आपला अर्ज दाखल केला.