
शेतकरी आंदोलनातून मागे हटलेले नाहीत, त्यांनी मैदान सोडलेले नाही. सध्या संपूर्ण केंद्र सरकारच पश्चिम बंगाल निवडणुकीच्या प्रचारात गुंतलेय. सरकार तेथून मागे दिल्लीत परतले की आम्ही पुन्हा सरकारशी चर्चा सुरू करू, असे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी रविवारी स्पष्ट केले. शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणावरून घरी परतल्याच्या चर्चांचे त्यांनी खंडन केले.
कृषी कायद्यांविरोधात शेतकऱयांचा पाठिंबा मिळवण्यासाठी टिकैत हे दोन दिवस गुजरातच्या दौऱयावर आहेत. रविवारी बनासकांठा जिह्यातील अंबाजी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांनी शेतकरी आंदोलनासंबंधी भूमिका मांडली. ते म्हणाले, केंद्राचे तिन्ही कृषी कायदे हे शेतकऱयांच्या नव्हे, तर व्यापाऱयांच्या भल्यासाठी आहेत.
जोपर्यंत शेतकऱयांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत ते आंदोलनाच्या ठिकाणावरून मागे हटणार नाहीत. शेतकरी आपल्या शेतातील कामे करण्यासाठी गेले आहेत. केंद्र सरकारही सध्या बंगालच्या निवडणूक प्रचारात व्यस्त आहे. सरकारला त्या प्रचारातून वेळ मिळाला की शेतकरीही मैदानात मागे परतून सरकारशी लढा देतील, अशी ठाम भूमिका टिपैत यांनी मांडली.


























































